Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खड्डा चुकवताना ट्रॅव्हल्सची बस पलटली; एकाचा मृत्यू, आठ प्रवासी जखमी

accident
वर्धा , गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (21:26 IST)
वर्ध्याच्या हिंगणघाट येथील नागपूर - हैदराबाद महामार्गावर खड्डा चुकवताना ट्रॅव्हल्सची बस पलटी झाल्याची घटना घडली असून, या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 8 प्रवासी जखमी झाले आहे.
 
छोट्या आर्वी शिवारातील सगुणा कंपनीजवळ भरधाव ट्रॅव्हल्स बस पलटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. पहाटे पाच वाजेच्या सुमारास रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही बस पलटी झाली. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत.
 
ही ट्रॅव्हल्स हैदराबाद येथून रायपूरकडे जात होती. ट्रॅव्हल्समधून 50 पेक्षा जास्त प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. ट्रॅव्हल्स भरधाव वेगात हैद्राबादवरून रायपूरकडे जात असताना हिंगणघाटजवळ पोहचली. छोटी आर्वीजवळ महामार्गावर असलेल्या खड्ड्यांचा अंदाज चालकाला न आल्यामुळे खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली.  
 
अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही किरकोळ जखमींना दुसर्‍या बसमध्ये बसवून देण्यात आले आहे. दरम्यान, हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. या अपघातीच नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या देशात कार विकत घ्यायला आधी लाखो रुपयांचा परवाना घ्यावा लागतो