Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ही अनोखी स्कूटर रस्त्यावर नाही तर झाडांवर चालते

ही अनोखी स्कूटर रस्त्यावर नाही तर झाडांवर चालते
, शनिवार, 19 मार्च 2022 (13:04 IST)
आपण अनेक नवनवीन आणि अनोख्या वाहनांबद्दल ऐकत असाल,आज आम्ही एका अशा स्कुटर बद्दल सांगत आहोत जी रस्त्यावर नाही तर झाडांवर चालते. ही एक ट्री क्लाइंबिंग स्कूटर आहे जी अवघ्या 30 सेकंदात झाडाच्या शीर्षावर घेऊन जाते. हे सर्वसामान्यांसाठी उपयुक्त नसली तरी शेतकऱ्यांसाठी ते खूप फायदेशीर ठरत आहे. या ट्री स्कूटरमुळे केवळ मेहनत आणि जोखीम कमी झाली नाही तर मजुरीवर होणारा खर्चही खूप कमी झाला आहे.
कर्नाटकातील मंगलोर येथील 50 वर्षीय शेतकरी गणपती भट्ट सुपारीची लागवड करतात आणि सुपारी तोडण्यासाठी त्यांना वेळोवेळी 60-70 फूट उंच झाडांवर चढावे लागते. हे खूप कष्टाचे आणि धोकादायक काम आहे, विशेषत: पावसाळ्यात जेव्हा झाडे ओली असतात. यावेळी, खूप उंचावरून पडल्यास मृत्यूचा धोका असतो. यापासून सुटका करण्यासाठी गणपतीने एक स्कूटर बनवली आहे, ज्यावर बसून आपण सरपटून झाडावर चढू शकता.
webdunia
गणपती भट्ट यांनी ही अनोखी स्कूटर घरीच तयार केली आहे. यात छोटी मोटर असून सीट देण्यात आली आहे. दोन चाके झाडावर घट्ट पकड ठेवण्यासाठी जवळ आहेत, याशिवाय सीटबेल्ट देखील येथे प्रदान केले आहेत. स्कूटरवरील हँडलबार ब्रेक आणि क्लच लीव्हरसह येतो आणि ट्री स्कूटरवर बसताना, एक्सलेटर वळवल्यावर टायर फिरतात आणि दोन्ही बाजूंनी झाडाला धरून झाडावर सहज चढता येते.
 
गणपती यांनी 2014मध्ये या स्कूटरवर काम सुरू केले आणि तब्बल 4 लाख संशोधन आणि 40 लाख रुपये खर्च करून ही ट्री स्कूटर तयार केली आहे. वैयक्तिक वापराव्यतिरिक्त, गणपती या स्कूटर ची विक्री देखील करतात आणि आतापर्यंत 62,000 रुपयांच्या या ट्री स्कूटरच्या 300 युनिट्सची विक्री केली आहे. वाढत्या वयानंतर आणि मजुरांच्या कमतरतेमुळे त्यांना ही कल्पना सुचली आहे, याशिवाय ही स्कूटर पावसाळ्यातही चांगली चालते, ज्यामुळे सुपारी आणि  नारळाची शेती करणाऱ्या शेतकर्‍यांची खूप सोय झाली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रवाशांनी भरलेली बस उलटल्याने 8 ठार, 25 गंभीर जखमी