Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हिडीओ बनवण्याच्या नादात रेल्वेची धडक बसून तिघे मित्र ठार

death
, रविवार, 10 एप्रिल 2022 (10:41 IST)
आजकाल इंटरनेटवर व्हायरल होण्याचे वेड प्रत्येकाला लागले आहे. जो पहा तो इन्स्टाग्राम रील्स तयार करून लाइक्स आणि शेअर्स गोळा करण्याच्या नादात आहे. या प्रकरणात अनेक तरुण धोकादायक व्हिडिओ बनवून सोशल मिडीयावर पोस्ट करतात. असे करणे खूप धोकादायक असू शकते. अशीच एक घटना तामिळनाडूतून समोर आली आहे, जिथे इंस्टाग्राम रील्स बनवण्याच्या नादात तीन मित्रांना आपला जीव गमवावा लागला आहे. 
 
तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या या तिघा मित्रांना प्रसिद्ध होण्याचे नाद लागले होते. या ते व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असे. नेहमी प्रमाणे हे तिघे मित्र रेल्वे ट्रॅकवर व्हिडिओ बनवण्यासाठी चेंगलपट्टूजवळील विल्लुपुरम येथे पोहोचले होते. गुरुवारी सायंकाळी एग्मोर येथून एक पॅसेंजर ट्रेन या रेल्वे ट्रॅकवरून जात होती. ट्रेन जात असताना तीन मित्रांनी व्हिडिओ बनवण्याचा विचार केला. 
 
यानंतर तिघे मित्र ट्रॅकवर व्हिडिओ बनवू लागले. त्यात या  तिन्ही मित्रांना ट्रेनची धडक बसली. व्हिडिओ बनवण्याच्या नादात या तिघांना आपला जीव गमवावा लागला. महिंद्रा सिटीजवळील रेल्वे फाटकापासून दीड किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. तिन्ही मित्रांचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान आहे. मृतांमध्ये एक तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. तर दुसरा रोजंदारी मजूर म्हणून काम करतो. तिघेही मित्र एकाच परिसरातील रहिवासी आहेत. 
 
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर तिन्ही मित्रांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चेंगलपेठच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. एका अधिकाऱ्याने या घटनेबाबत सांगितले की, तिघांचे सोशल मीडिया प्रोफाइल तपासले जात आहेत. यानंतर तिघांनीही यापूर्वीही असे व्हिडिओ अपलोड केले आहेत का, हे समजू शकेल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Petrol Diesel Price : तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे दर,आजचे दर जाणून घ्या