Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशाची राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले

webdunia
, गुरूवार, 5 जानेवारी 2023 (21:55 IST)
देशाची राजधानी दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय काश्मीरमध्येही पृथ्वी हादरली. काश्मीरमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6 इतकी मोजण्यात आली आहे. काश्मीरमधील भूकंपाचे केंद्र हिंदुकुश प्रदेश, अफगाणिस्तान असल्याचे सांगितले जाते. हा भूकंप इतका जोरदार होता की पाकिस्तानच्या लाहोर आणि इस्लामाबादसह अनेक शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
  
7.56 वाजता दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर लोक घराबाहेर पडले आणि मैदानात जमा झाले. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, मात्र अद्याप कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले.
 
यापूर्वीही दिल्लीत भूकंप झाला होता.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, रविवारी (नवीन वर्षाच्या रात्री) पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. NCS ही देशातील भूकंप क्रियाकलापांवर देखरेख ठेवणारी भारत सरकारची नोडल एजन्सी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरोग्य विद्यापीठातील वनस्पती, वृक्षांची क्युआर कोडव्दारा मिळणार माहिती