Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे पोते भरून नकली सोने- चांदीच्या वस्तू

vitthal
, गुरूवार, 5 जानेवारी 2023 (21:35 IST)
नवस फेडण्यासाठी अनेक गोरगरीब भाविक नकली सोने, चांदीचे दागिने अर्पण करून आपापला नवस फेडताना आढळून येत असतात. यामुळे सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे पोते भरून नकली सोने- चांदीच्या वस्तू साठल्या आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सोने-चांदीच्या अनेक वस्तू भेट येतात. यामध्ये छोट्या-मोठ्या दागिन्यांचा सहभाग असतो. या सोने-चांदीच्या अनेक वस्तू सांभाळण्यासाठी मंदिर समितीचा एक स्वतंत्र विभाग आहे. या विभागाचे काम विभागप्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी पाहत आहेत. तसेच सोने चांदीच्या वस्तूंच्या तपासणीकरिता दत्तात्रय सुपेकर व गणेश भंडगे असे दोन सराफ मानधनावर नेमण्यात आले आहेत.
 
चांदीच्या धातूसारख्या दिसणाऱ्या वस्तूंमध्ये पाळणे, घोडे, डोळे, निरांजन, जोडवी, पैंजण, हळदी कुंकवाच्या डब्या तबक आणि सोन्याच्या धातूसारख्या दिसणाऱ्या वस्तूंमध्ये मणी मंगळसूत्र, नथ, कानातील दागिने दानपेटीत आढळून येतात. त्या सोन्या-चांदीसारखे दिसणाऱ्या वस्तू अधिक आवश्यक नसल्यामुळे त्यांचे मोजमाप होत नाही; परंतु त्या जतन करून ठेवल्या जातात. सध्या समितीकडे नकली सोने- चांदीच्या पोतेभर वस्तू साठल्या आहेत.
 
दानपेटीत आढळली नकली चांदी
 
बऱ्याचशा सोने-चांदीसारख्या दिसणाऱ्या सेम टू सेम वस्तू या दानपेटीत आढळून आल्या आहेत. दानपेटीबरोबर भाविकांनी विठोबाच्या चरणांवर अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये नकली चांदी आढळून आल्याचे आढळून आले असल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उर्फीच्या विकृतीची महिला आयोगाने स्वाधिकाराने दखल का घेतली नाही