Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिहेरी तलाक विरोधात लढणाऱ्या इशरत जहाँची मुले बेपत्ता

तिहेरी तलाक विरोधात लढणाऱ्या इशरत जहाँची मुले बेपत्ता
तिहेरी तलाक विरोधात याचिका करणाऱ्या  इशरत जहाँ यांनी आपली दोन मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. 
 
पश्चिम बंगालच्या हावडाममध्ये राहणा-या इशरत जहाँ यांनी गुरुवारी हावडाच्या गोलाबारी पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदविली आहे. दरम्यान, तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर इशरत जहाँ यांनी आपल्याला सासरच्या मंडळींकडून आणि शेजा-यांकडून धमकीचे फोन आल्याचे म्हटले होते. सध्या  इशरत जहाँ हावडाच्या पिलखाना भागात आपल्या चार मुलांना घेऊन राहतात. इशरत जहाँ यांना 2014 मध्ये त्यांच्या नव-याने दुबईहून फोनवरुन तलाक दिला होता.  तिहेरी तलाक विरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच प्रमुख महिलांमध्ये इशरत जहाँ  यांच्यासह शायरा बानो, आफरीन रहमान, अतिया साबरी, गुलशन परवीन यांचा समावेश आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विकास दरात 5.7 टक्क्यांपर्यंत घसरण