जम्मू काश्मीरची वैष्णो देवी मंदिराच्या रस्त्यावर दरड कोसळून दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला तर एक मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले आहे.
हा अपघात वैष्णो देवी भवन रोड वर पंची हेलिपॅड जवळ झाला असून या अपघातात दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे सीईओ यांनी दिली असून ते म्हणाले, वैष्णो देवी भवनच्या जवळ दरड कोसळली आहे.
वैष्णो देवी श्राइन बोर्डाचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले आहे. बचावकार्य सुरु आहे. अपघातात एक मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात उपचारासाठी dakhal करण्यात आले आहे.