यंदाच्या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली आहे. हे वर्ष अमृतमहोत्सव साजरा करत आहे. या अमृतमहोत्सवाच्या निमित्तानं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांना मान वंदना देण्यासाठी देशात नागरिकांसाठी विविध निर्णय घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहे.
शिक्षण मंत्रालय शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या कथांचा समावेश करेल, असे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी एका पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असताना त्यांनी सांगितले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, भारतातील वीरांचा सन्मान करण्यापेक्षा अमृत महोत्सवाचा दुसरा चांगला उत्सव असू शकत नाही. वीरगाथा प्रकल्प सुरू केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानले. ते म्हणाले की देशभक्तीची तीव्र भावना आणि आपल्या शूरवीरांप्रती कृतज्ञतेची भावना विकसित करण्याची ही गुरुकिल्ली आहे.
आझादी का अमृत महोत्सव' चा एक भाग म्हणून, मुलांना शौर्य कृत्यांची प्रेरणा आणि माहिती देण्यासाठी वीर गाथा आयोजित करण्यात आली होती. 21 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2021 दरम्यान देशव्यापी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना रेखाचित्रे, निबंध, कविता आणि मल्टीमीडिया सादरीकरणाद्वारे प्रेरणादायी कथा शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि मूल्यांकनाच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांना "सुपर 25" म्हणून घोषित करण्यात आले. "वीर गाथा" स्पर्धेतीलसुपर 25 विजेत्यांना सन्मानित करणार्या एका पुरस्कार सोहळ्यात ते उपस्थितांना संबोधित करत होते.