Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तरकाशी :भुयाऱ्यात अडकलेल्यांना आता नव्या पाईपमधून अन्नपुरवठा, रिपोर्ट

uttarkashi tunnel
, बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (13:58 IST)
उत्तरकाशी : उत्तराखंडमधील कोसळलेल्या बोगद्याच्या ढिगाऱ्यातून बचावकर्त्यांनी सोमवारी सहा इंच रुंददीची पाईपलाईन घातल्यामुळे आठ दिवसांपासून अडकलेल्या 41 कामगारांना मोठ्या प्रमाणात अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आता नव्या पाईपलाईनमधून अन्न, पाणी आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
 
उत्तरकाशी जिह्यातील सिलक्यारा गावात बांधकामाधीन बोगद्याचा एक भाग 12 नोव्हेंबर रोजी भूस्खलनामुळे कोसळल्यापासून 41 कामगार अडकले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी ढिगाऱ्याच्या पलीकडे असलेल्या बोगद्याच्या विभागात ड्रायफ्रूट आणि औषधे आणि ऑक्सिजन आदींचा पुरवठा चार इंची पाईपमधून केला जात होता. आता नवीन पाईपलाईनमुळे रोटी आणि भाजीसारखे खाद्यपदार्थ कामगारांना पाठवता येतील.
 
सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी परदेशी तज्ञांची मदत घेतली जात आहे. शनिवारी अभियांत्रिकी तज्ञ अरमांडो पॅपेलन आणि मायक्रोटनेलिंग तज्ञ ख्रिस कूपर देखील बचावकार्यात मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही घटनास्थळ गाठून मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. आता हॉलंडमधून मागविण्यात आलेली ड्रिलिंग मशीनही घनटास्थळी दाखल झाली असून नवा बचावमार्ग खोदण्याचे काम सुरू झाले आहे.
 
भुयारामध्ये अडकलेल्या सर्व मजुरांना वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. सध्या केंद्र आणि राज्यातील एकूण सहा पथके काम करत आहेत. पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव मंगेश घिलडियाल, माजी सल्लागार भास्कर खुल्बे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव महमूद अहमद आणि भूगर्भशास्त्रज्ञ वऊण अधिकारी आदी वरिष्ठ मंडळी घटनास्थळी प्रत्यक्ष नजर ठेवून आहेत.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वादग्रस्त टिप्पणीनंतर बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री अखेर तुकोबा चरणी