बारासात (पश्चिम बंगाल)- पश्चिम बंगालच्या उत्तरी 24 परगना जिल्ह्यात एका नायिकेला नाटकादरम्यान जिवंत सापासोबत नाचणे महागत पडले. नाटकाचा भाग म्हणून ती सापासोबत डांस करत असताना सापाने दंश केला आणि तिचा मृत्यू झाला.
63 वर्षीय ही नायिका 'मंसामंगल काव्य' वर आधारित नाटकादरम्यान जिवंत सापासोबत नाचत होती. अचानक सापाने तिचा दंश केला. नंतर तिला स्थानिक प्राथमिक रुग्णालयात हालवण्यात आले जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
ही घटना मंगळवार रात्री हसनाबाद पोलिस स्टेशनाच्या बारूनहाट गावाची आहे. हे नाटक सापांची देवी मंसाच्या कहाणीवर आधारित आहे. सहकलाकाराप्रमाणे एका मांत्रिकाने तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्नदेखील केला परंतू तो अयशस्वी ठरला. अर्थातच आजही देशात असे अनेक क्षेत्र आहे जिथल्या लोकांचा विश्वास आहे की तंत्र मंत्र करून यावर उपचार केला जाऊ शकतो.