रेल्वने प्रवास करताना अनेक जण तिकीट सुद्धा घेत नाही . भारताच्या रुळांवर धावणाऱ्या पॅसेंजर, लोकल, साप्ताहिक यांसारख्या गाड्यांमध्ये प्रवासी अनेकदा जड सामान घेऊन जातात. अनेकजण यापलीकडे जाऊन जनावरे सोबत घेऊन प्रवास करू लागतात.आणि तिकीट सुद्धा काढत नाही.
मात्र एका महिला प्रवाशाने प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून आपल्या शेळीचे तिकीटही कापले. भारतीय रेल्वे ट्रेनच्या जनरल डब्यात ही महिला तिची शेळी आणि अन्य एका व्यक्तीसोबत उभी राहून प्रवास करत होती.
महिलेने बकरीला हाताने धरले होते. ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक (टीटीई) ने जनरल कोचमधील सीटवर बसलेल्या प्रवाशांशिवाय उभ्या असलेल्या लोकांची तिकिटे तपासण्यास सुरुवात केली. त्यानंतर टीटीईची नजर डब्याच्या गेटजवळ उभ्या असलेल्या एक पुरुष, महिला आणि बकरीवर पडली.
टीटीईने शेळीला धरून उभ्या असलेल्या महिला प्रवाशाकडून तिकीट मागितले. यावर महिलेसोबत उभ्या असलेल्या व्यक्तीने तिकीट दाखवले. तिकीट पर्यवेक्षकाने हसून विचारले - तुम्ही बकरीचे तिकीट घेतले नाही का? मात्र आश्चर्याची बाब म्हणजे महिला प्रवाशाने केवळ स्वत:साठीच नाही तर तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या बकरीसाठीही रेल्वेचे तिकीट काढले होते. महिलेने तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीसह एकूण 3 प्रवाशांसाठी तिकीट बुक केल्याचेही टीटीईच्या लक्षात आले. म्हणजे शेळीसाठीही तिकीट काढले होते. यावेळी महिलेच्या प्रामाणिकपणावर टीटीईही हसायला लागले. त्याचवेळी शेळीपालन करणाऱ्या महिला प्रवाशाच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य पाहून तिकीट तपासनीस अवाक झाला.