rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरा डिनरसाठी बाहेर गेला तर नाराज होऊन पत्नीने काय केले बघा

national news
नंद नगरी भागात मामुली भांडण झाल्यानंतर नवरा डिनरसाठी बाहेर निघून गेला तर नाराज पत्नीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना सुसाइड नोट सापडला नाही. आणि चौकशीत कळून आले की नवरा-बायकोचे संबंध खूप चांगले होते. या घटनेमुळे नवर्‍याला धक्का बसला आहे. 
 
पोलिसांप्रमाणे, संगीता ही ई-ब्लॉक, नंद नगरीमध्ये पती रामकिशन आणि इतर नातेवाइकांसोबत राहत होती. रामकिशन प्रायव्हेट जॉबमध्ये आहे. रविवारी संध्याकाळी बायकोने नवर्‍यासाठी जेवण तयार केले परंतू दोघांमध्ये वाद झाला आणि जराश्या भांडणानंतर नवरा घराबाहेर निघून गेला. त्याने डिनर बाहेरच करून घेतले. रात्री उशिरा तो घरी पोहचला तर पत्नीने जेवण्याचा आग्रह केला तर त्याने बाहेर डिनर केल्याचे सांगितले. याच गोष्टीवर पुन्हा वाद सुरू झाला. 
 
नंतर नवरा-बायको झोपून गेले. सोमवारी सकाळी उठल्यावर पतीने बघितले की पत्नी संगीता पंख्यावर लटकली आहे. नवर्‍याने लगेच तिला खाली उतरवले आणि जवळीक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला परंतू डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. संगीताच्या कुटुंबाकडून रामकिशनविरुदध तक्रार दाखल केली गेली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हातारा बाप सहा वर्षांपासून करत होता मुलीसोबत दुष्कर्म