Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमित शहा मातोश्रीवर येणार , कोंडी फुटणार का?

अमित शहा मातोश्रीवर  येणार , कोंडी फुटणार का?
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तीन दिवसाच्या मुंबई दौ-यावर येणार असून यावेळी ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. शिवसेना सातत्याने सरकार विरोधी भूमिका घेऊन भाजपाची कोंडी करत असल्याने युतीच्या संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही पक्षप्रमुखांची ही भेट होत आहे.शिवसेना भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये सहभागी असली तरी, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाला साथ देण्याचे कोणतेही आश्वासन शिवसेनेने दिलेले नाही. आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाला शिवसेनेच्या मदतीची गरज पडणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दीपिका साकारणार सिंधूची भूमिका