Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगातील सर्वात लहान पिझ्झा, झाली लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

जगातील सर्वात लहान पिझ्झा, झाली  लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद
, बुधवार, 27 डिसेंबर 2017 (11:11 IST)

पुण्यात जगातील सर्वात लहान पिझ्झा तयार करण्याचा विक्रम सर्वेश जाधव व त्याच्या सहकाऱ्यांनी केला. या सर्वात लहान पिझ्झाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली. या पिझ्झाचा आकार फक्त एक इंच असून तो बनविणारा सर्वेश जगातील एकमेव आहे. हा पिझ्झा नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने बनविण्यात आला असून शिमला मिरची, मोझरेला चिजच्या साहाय्याने सजविण्यात आला होता. आकाराने लहान असल्याने तो सहज खाता यावा म्हणून त्यात फोर्सिप व ड्रॉपरसचा वापर करण्यात आला होता. नाताळनिमित्त असे चार हजार पिझ्झा बनवून ते खडकी कॅन्टोन्मेंट भागातील वंचित मुलांना देण्यात आले.

या विक्रमाच्या वेळी पाककला विश्वातील शेफ विष्णु मनोहर, सरपोतदार केटर्सचे किशोर सरपोतदार, पुणे रेस्टॉरंटचे प्रदीप बलवळकर उपस्थित होते. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिसेस युनायटेड नेशन 2018 साठी श्रद्धा करणार देशाचे प्रतिनिधित्व