Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नोटबंदी ही सरकारची मोठी चूक, भाजपला घरचा आहेर

नोटबंदी ही सरकारची मोठी चूक, भाजपला घरचा आहेर
सोशल मीडियावर विरोधी सूर झाल्यावर आता भाजपला त्यांच्या पक्षातून विरोध सुरु झाला आहे. यामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे सहकारी आणि त्यांच्या काळातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवरुन सरकार वर जोरदार टीका केली आहे. सिन्हा म्हणतात की  मंदीत नोटीबंदी करुन देशाच्या आर्थिक स्थितीत   तेल ओतत आजून आग भडकावली आहे. सिन्हा यांनी इंग्रजी वृत्तपत्र ‘इंडियन एक्स्प्रेस’यांनी लेख लिहिला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
 
सिन्हा टीका करतात की आपल्या देशाचे पंतप्रधान दावा करत आहेत, अत्यंत जवळून त्यांनी  गरिबी पाहिली आहे. मात्र हेच ध्येय ठेऊन  देशातील प्रत्येक नागरिकाने गरिबी जवळून पाहावी असेच निणर्य  अर्थमंत्री दिवस-रात्र मेहनत करत घेत आहेत .या प्रकारे कणखर टीका यशवंत सिन्हा यांनी अरुण जेटलींवर केली आहे. माजी अर्थमंत्री पुढे म्हणतात की आपल्या देशातील अर्थव्यवस्था त्यांनी वाट लावली आहे.  मी जे बोलतोय त्याच्याशी भाजपचे अनेक लोक सहमत होतील. मात्र भीतीमुळे ते बोलत नाहीत. असेही यशवंत सिन्हा यांनी लेखात म्हटलं आहे.विकास दर घसरुन 5.7 टक्के झाला. गेल्या तीन वर्षातील ही सर्वात मोठी घसरण आहे. मात्र हे नोटबंदी या निर्णयामुळे हा प्रकार घडला आहे. मात्र अनेक भाजपातील लोक मानत नाहीत तर अनेक हे मान्य असून त्यांना हे बोलता येत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मालेगाव बॉम्बस्फोट: रमेश उपाध्यायालही जामीन