सध्या कोन्ग्रेस नेते असलेले नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर भाजपाच्या दिल्ली येथे निर्णय होणार आहे. यामध्ये भाजपची केंद्रीय पक्ष कार्यकारणी दरम्यान अंतिम निर्णय होणार आहे. भाजपा मध्ये नारायण राणे प्रवेश करण्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तरीही महाराष्ट्र आणि इतर कोणताही महत्वाचा नेता भाजपाकडून विषयांवर कोणीच बोलताना दिसत नाही.
राणे हे भाजपात येणार की नाही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह हेच अंतिम निर्णय घेतील असे तरी चित्र आता समोर आहे. मुख्यमंत्री यांचा राणे यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर अमित शाह लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जागा कश्या पुन्हा शाबूत राखता येतील हे पाहत आहेत. तर दिल्ली येथे २४, २५ सप्टेंबरला कार्यकारणी बैठक आहे. तेव्हाच राणे प्रवेशाच्या चर्चेबाबत अंतिम काय तो निर्णय होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.