Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Monsoon Update: मुसळधार पावसामुळे केरळच्या 9 जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा

Monsoon Update: मुसळधार पावसामुळे केरळच्या 9 जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा
कोची , सोमवार, 1 जून 2020 (15:17 IST)
दक्षिण-पश्चिम मान्सूनने सोमवारी केरळमध्ये जोरदार दणका दिला. कोझीकोड जिल्ह्यात आज सकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी भारत हवामान खात्याने ही माहिती दिली. केरळमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आयएमडीने तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, आलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे.
 
यापूर्वी, भारतीय हवामानशास्त्र विभागाने आपल्या अंदाजानुसार केरळमध्ये यंदा उशिरा पावसाळा येईल, असे सांगितले होते. आयएमडीने म्हटले आहे की यावर्षी केरळमध्ये मान्सून 5 जूनपर्यंत येऊ शकेल.
 
महत्त्वाचे म्हणजे की जून ते सप्टेंबर या चार महिन्यांपर्यंत मान्सूनच्या हंगामात 75 टक्के पाऊस पडतो.
 
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला. सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हे हळू आहे. 3-4 तारखेच्या दरम्यान पावसामुळे दादरा नगर हवेली, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दमण दीव येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशात, लोकांना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पतीला पालकांपासून विभक्त होण्यास भाग पाडणे, घटस्फोट घेण्याचा एक वैध आधार असू शकतो - केरळ उच्च न्यायालय