Publish Date: Mon, 29 Apr 2024 (17:35 IST)
Updated Date: Mon, 29 Apr 2024 (17:38 IST)
मेरठच्या लिसाडिगेटमध्ये एक मुलगी तिच्या चुलत बहिणीच्या हळदी कार्यक्रमात नाचताना खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.चुलत बहिणीच्या लग्नाच्या समारंभात ही तरुणी नाचता नाचता खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.
सदर घटना शनिवारी रात्रीची मेरठच्या अहमदनगर गल्ली नंबर 2 येथील रहिवासी आफताब यांच्या मुलीची वरात रविवारी येणार होती. घरात हळदीच्या समारंभात वधूची चुलत बहीण रिमशा ही डीजेवर नाचत होती नाचता नाचता रिमशा खाली कोसळली. तिला जवळच्या मुलींनी उठवले पण ती उठली नाही. घरात आरडा ओरड सुरु झाली तरुणीला तातडीनं कुटुंबीय रुग्णालयात घेऊन गेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
तिच्या मृत्यू नंतर घरातील आनंदाचे वातावरण शोकाकुल झाले.
Edited By- Priya Dixit