मुंबई- कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नसतो. दहशत निर्माण करणार्यांचा कोणताही धर्म नसतो, मात्र एखाद्या धर्माचा चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जातो, असे अभिनेता आमीर खान याने म्हटले.
ईद निमित्त पत्रकार परिषदेत बोलताना आमीर म्हणाला, ‘कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही. दहशतवाद आणि धर्माचा संबंध लावणे योग्य नाही. प्रत्येक धर्मातील व्यक्ती आपल्या धर्मासाठी काहीतरी चांगल करण्याचा
प्रयत्न करत असतो. जे लोकं दहशतवाद पसरवितात त्यांना धर्माशी काही देणे-घेणे नसते. जर त्यांनी धर्माचं खरोखर पालन केलं असते तर त्यांनी प्रेम शिकवले असते.‘
बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणांच्या रडारावर असलेल्या डॉ. झाकिर नाईक यांच्याबाबत विचारल्यानंतर आमीरने कोणतीही प्रतिक्रिया द्यायला इनकार केला.