भारतीयांना पिझ्झाची चटक लागली आहे, हेच ओळखून आता भारतीय सन उत्सव लक्षात घेऊन पिझ्झा मध्ये खास भारतीय टच दिला जातोय. याचाच एक भाग म्हणून डॉमिनोजनं खास शाकाहारी पिझ्झा सर्व्ह करण्याचा बेत आखला आहे. एक ऑक्टोबर म्हणजेच घटस्थापनेपासून जवळपास अर्ध्याहून अधिक डॉमिनोजची रेस्टॉरंट शाकाहारी होणार आहेत.
यामध्ये उत्तर आणि दक्षिण भारतातील डॉमिनोजच्या 500 आऊटलेट्समध्ये मांसाहारी पदार्थ सर्व्ह केले जाणार नाहीत. पहिल्यांदाच एखाद्या पाश्चिमात्य खाद्यपदार्थ कंपनीनं नवरात्रीसाठी अशा मोठ्या प्रकाराचा बदल केला आहे. नेहमी असलेल्या पिझ्झा मध्ये बदल करून यामध्ये शिंगाडा, साबुदाणा यासारख्या उपवासाच्या पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. नवरात्रीमध्ये मासांहारी पदार्थाची मागणी खूपच कमी होते. त्यामुळे गेल्या 2 वर्षात डॉमिनोजला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे सुद्द्धा विक्रीला नवी उभारी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.