Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बस कालव्यात कोसळून नऊ जणांचा मृत्यू

बस कालव्यात कोसळून नऊ जणांचा मृत्यू
हैद्राबाद , सोमवार, 22 ऑगस्ट 2016 (10:47 IST)
बस पुलावरुन नागार्जूनसागर कालव्यात कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले. तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यात बस हैद्राबादहून खम्मम जिल्ह्याकडे चालली असताना हा अपघात झाला.

खम्मम जिल्ह्यातील काकिनाडा येथे बस चालली असताना नागार्जूनसागर कालव्याजवळ पोहोचल्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बसचा अपघात झाला. बसमध्ये एकूण 31 प्रवासी प्रवास करत आहे. मृत्यूचा आकडा अजून वाढण्याची भीती आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या द्रोणाचार्यांनी घर गहाण ठेवून भारताला मिळवून दिली दोन पदके