निरास आणि काळे पांढरे असणारे मतदार ओळखपत्र आता आपले रूप बदलणार असून मतदारांना रंगीत मतदान ओळखपत्र देण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. हे कार्ड तर स्मार्ट तर असणार तर सोबत हे रंगीतही असणार आहे.नवीन स्मार्ट कार्डसाठी 20 रुपये आकारले जाणार आहेत.
जुने मतदान कार्ड हे अगदी निरास होते तर अनेकदा यावरील फोटो सुद्धा ओळखता येत नव्हता. त्यामुळे मतदारही या कार्डबाबत नाराजी व्यक्त करतात. सरसकट मोफत सर्वांचेच कार्ड डिजिटलाईज न करता हे कार्ड ऐच्छिक केले आहे. ज्याला ते डिजिटलाईज हवे असेल त्याच्याकडून कार्डासाठी 20 रुपयांची आकारणी केली जाईल.
विशेष म्हणजे हा निर्णय भारत निवडणूक आयोगानेच घेतला आहे. त्यांनी त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हे कार्ड छापून देणारी संस्था (कंत्राटदार) निश्चित केली आहे. आता सेतूत 20 रुपये भरून नवीन डिजिटलाईज मतदान कार्ड संबंधित मतदाराला मिळेल.