नवी दिल्ली- बंडखोर आमदारांना काँग्रेस पक्षात परत आणण्यासाठी पैशाचे आमिष दाखवित असल्याच्या स्टिंग प्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांना रविवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) समन्स बजाविले आहे. रावत यांना 24 मे रोजी सीबीआयसमोर उपस्थित रहावे लागणार आहे.
रावत यांना यापूर्वीही सीबीआयने समन्स पाठविलेले होते. पण, त्यांनी सीबीआयकडे मुदत मागितली होती. आता त्यांना पुन्हा समन्स पाठविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना सीबीआयसमोर हजर राहावे लागणार आहे.