Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चैत्र गौरी माहिती

चैत्र गौरी माहिती
, मंगळवार, 29 मार्च 2022 (17:32 IST)
महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसविली जाते. देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेपर्यंत गौरीची पूजा केली जाते. शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपात पूजली जाते.
 
चैत्र महिन्यात स्त्रिया साजरा करीत असलेला हा एक पारंपरिक सोहळा आहे. स्त्रिया आपापल्या घरी हा समारंभ साजरा करतात. चैत्र शुक्ल तृतीयेला एका छोट्या पितळी पाळण्यामध्ये गौरीची स्थापना केली जाते. घरामध्ये असणारी गौरीची मूर्तीच स्वच्छ करुन तिची प्रतिष्ठापना केली जाते. महिनाभर गौरी माहेरी आली म्हणून तिचे कोडकौतुकं पुरवले जातात. महिन्यातल्या कोणत्याही एका दिवशी सवाष्ण जेवू घालतात. आणि आजूबाजूच्या स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलावतात. अनेकांकडे घरी आलेल्या स्त्रिया व कुमारिका यांचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात. भिजविलेले हरभरे आणि फळे यांनी त्यांची ओटी भरतात. तसेच कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरबऱ्याची डाळ प्रसाद म्हणून देतात. सवाष्णींना सुंगधी फुले देखील दिली जातात. घरातील स्त्रिया हळदी कुंकू करतात त्यावेळी चैत्रगौरीपुढे शोभिवंत आरास मांडण्याची पद्धतही आहे. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे. गौरीची आरती करताना काही ठिकाणी गौरीचे माहेर हे विशिष्ट गाणे म्हटले जाते.
 
तसेच या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते. देवीची शस्त्रे म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड होत. तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन, ॐ, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर- पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतीके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण.
 
चैत्रांगणामध्ये चैत्रगौरीचा पाळणा, गणपती, समई, नाभी कमळ, कासव, शंख, सूर्य, चंद्र, गोपद्म, सर्प, त्रिशूळ, स्वस्तिक, कमळ, गदा, चक्र, इ. हिंदू धार्मिक तसेच नैसर्गिक आकृत्या काढल्या जातात.यामध्ये प्रत्येक महिन्यात साज-या होणा-या विविध सण व व्रतांचे  अंकन रांगोळीच्या माध्यमातून केले जाते. मध्यभागी झोपाळ्यात बसलेल्या देवीचे चित्र, राधाकृष्ण, तुळशी अशी चित्रे चैत्रांगणात काढली जातात.
 
सर्व कौतुक होत असताना अखरे अक्षयतृतीयेला गौर पुन्हा सासरी जायाला निघते तेव्हा तिला खीर-कानोला, दहीभात, आंब्याचा रस असा नैवेद्य दाखवला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ram Navami 2022 कधी आहे रामनवमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी