Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरात्र विशेष रेसिपी : कच्च्या केळीची चविष्ट टिक्की

नवरात्र विशेष रेसिपी : कच्च्या केळीची चविष्ट टिक्की
, गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (14:49 IST)
नवरात्रीत देवी आईचा आशीर्वाद मिळविण्यासाठी जिथे लोकं आपापल्या घरात घट स्थापना करतात. त्याच बरोबर पूजेसह उपवासाचे संकल्प देखील घेतात. नऊ दिवसांच्या उपवासात अन्न-धान्याशिवाय उपवास करणं कठीणच आहे पण उपवासासाठी अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपण बनवून खाऊ शकता. जे आपल्या उपवासात सात्विक होण्या सह आरोग्यासाठी देखील फायदेशीर असेल. जसे की कच्च्या केळीची टिक्की
 
बरेच लोकं उपवासात बटाट्यासह कुट्टूच्या पिठाचे, शिंघाड्याच्या पिठाचे सेवन करतात. पण आपण ह्या व्यतिरिक्त देखील काही वेगळे चविष्ट खाण्याची इच्छा बाळगता तर आपल्यासाठी कच्च्या केळीची टिक्की हे परिपूर्ण असणार. आपली इच्छा असल्यास आपण सेंधव मीठ घालून किंवा मीठ न घालता देखील बनवू शकता. प्रत्येक चव वेगळी आणि चविष्टच असणार. 
 
साहित्य -
उकडलेले कच्चे केळे, उकडलेले बटाटे, कुट्टूचं पीठ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, तळण्यासाठी शेंगदाणा तेल किंवा तूप, सेंधव मीठ चवीपुरती.
 
कृती - 
सर्वप्रथम बटाटे आणि कच्चे केळे उकडवून घ्या. केळी साला सकटच उकडा. आता केळीची साल काढून त्याला कुस्करून त्यामध्ये कुट्टूचं पीठ आणि चवीपुरती सेंधव मीठ घालून मिसळून घ्या. या मिश्रणाचे दाटसर घोळ बनवून ठेवून द्या.
 
आता उकडलेला बटाटा कुस्करून त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचं कूट, कोथींबीर आणि मीठ घाला. आता या सारणाचे लहान लहान पेढेगाठी गोळे बनवून ठेवा. त्याला हाताने टिक्कीचा आकार द्या. 
 
आता गॅसवर कढई तापविण्यासाठी ठेवा. त्यामध्ये तूप किंवा शेंगदाण्याचं तेल घाला. तेल किंवा तूप गरम झाल्यावर बटाट्याच्या टिक्कीला केळ आणि कुट्टूच्या पिठाच्या दाटसर घोळात बुडवून गरम तेलात किंवा तुपात सोडा. मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. आता या तळलेल्या टिक्किना एका ताटलीत टिशू पेपर वर काढून घ्या. जेणे करून टिशू सर्व तेल शोषून घेईल. 
 
आता या टिक्की हिरव्या चटणीसह सर्व्ह करा. कच्च्या केळीने बनलेल्या या टिक्की चविष्ट तर असणारच. त्याशिवाय आरोग्यासाठी देखील चांगलीच असते आणि हे खाल्ल्यावर आपल्याला भूक देखील लागणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पूजा करावी की नाही जाणून घ्या खास माहिती