Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आदिशक्तीचा करा जागर,आलें नवरात्र

ekvira devi dhule
रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (10:50 IST)
आदिशक्तीचा करा जागर,आलें नवरात्र,
महामायेचा असें वावर, यत्र, तत्र सर्वत्र,
कर नित्य आदर स्त्रीशक्ती चा, रे मानवा !
नवरात्री पुरता नको ठेऊस, तो सदा करावा,
संहारूनी दैत्या तिनेच जगता उध्दारिले,
महाकाळ राक्षसास,पापा चे शासन ते दिधले,
पाशवी वृत्तीस घालुनी आळा, विजय मिळविला,
अवघ्या जगताला देवी ने, आशिर्वाद दिला!
आपण ही ठेऊ त्याचे स्मरण,नित्य करून सेवा,
मातृशक्ती चा जयजयकार,हाच नारा हवा,
विविध रूपे देवीची होतील जागृत आता,
घटस्थापना होऊनिया , ठेवतील अखंड दीप तेवता !
...अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सातवी माळ: कालरात्री पूजा, मंत्र आणि स्तोत्र