नवरात्रात देवी आई जगदंबाची पूजा करणे विशेष फलदायी आहे. नवरात्र एक असा सण आहे ज्यामध्ये महाकाली, महालक्ष्मी आणि आई सरस्वती यांची साधना करून जीवनाला अर्थपूर्ण बनवता येतं. अश्या देवी आई दुर्गेची कृपा मिळविण्यासाठी, काही सोपे अशे 13 उपाय खाली दिले आहे.
1 आपल्या घराच्या पूजा स्थळी भगवती दुर्गा, भगवती लक्ष्मी आणि आई सरस्वतीच्या चित्रांची स्थापना करून त्यांना फुलांनी सजवून पूजा करावी.
2 आई दुर्गेला तुळशी दल आणि दूर्वा अर्पण करण्यास मनाई आहे.
3 नऊ दिवसापर्यंत देवी आईचे उपवास करा. जर आपल्या मध्ये शक्ती नसल्यास पहिल्या, चवथ्या आणि आठव्या दिवसाचा उपवास करा. आपल्यावर देवी आईची कृपा नक्की होणार.
4 नऊ दिवसापर्यंत घरात आई दुर्गेच्या नावाने दिवा लावावा.
5 'ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै' या नवार्ण मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा.
6 या दिवसात दुर्गासप्तशतीचे पाठ आवर्जून करावे.
7 पूजेत लाल रंगाचे आसन वापरणे चांगले असतं. आसन लाल रंगाचे आणि लोकरीचे असावे.
8 लाल रंगाचे आसन नसल्यावर कांबळ्याचे आसन मांडून त्यावर लाल रंगाचे कापड टाकून त्यावर बसून पूजा करावी.
9 पूजा पूर्ण झाल्यावर आसनाला नमस्कार करून त्याला गुंडाळून एखाद्या सुरक्षित जागेवर ठेवावं.
10 पूजेच्या वेळी लाल रंगाचे कपडे घालणं शुभ असतं. लाल रंगाचे तिलक पण लावावे. लाल कपड्याने आपल्याला एक विशेष ऊर्जा मिळते.
11 देवी आईला सकाळी मध मिसळून दूध अर्पण करावं. पूजेच्या जवळ हे ग्रहण केल्यानं आत्मा आणि शरीरास शक्ती मिळते. हे एक चांगले उपाय आहे.
12 अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कुमारिकांची पूजा करावी.
13 शेवटच्या दिवशी घरात ठेवलेल्या पुस्तक, वाद्य यंत्र, पेन इत्यादींची पूजा करावी.
या वरील सर्व नियमाचं पालन करून देवी आईला प्रसन्न करावे.