Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरात्रीत कोणत्या देवी कोणता प्रसाद चढवावा जाणून घ्या

नवरात्रीत कोणत्या देवी कोणता प्रसाद चढवावा जाणून घ्या
तूप
नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पित असतो. महादेवांची पत्नी आणि नव दुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचं महत्त्व आणि शक्ती अनंत आहे. या दिवशी देवीला तुपाचा नैवेद्य दाखवावा. याने भक्त निरोगी राहतात आणि त्यांचे सर्व दु:ख नाहीसे होतात.
 
साखर 
नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची आराधना केली जाते आणि या देवीला साखर प्रिय आहे. दीर्घायुष्याची कामना करत या देवीला साखर, पांढरी मिठाई आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
 
दूध
नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी अर्थात तृतीयेला दुर्गा देवीच्या चंद्रघंटा या रूपात पूजा केली जाते. या देवीला दूध, खीर किंवा दुधाने तयार मिठाईचं नैवेद्य दाखवावं. याने भक्तांना सर्व दु:खांपासून मुक्ती मिळते.
 
मालपुआ
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. देवीच्या या रूपाच्या कृपेने निर्णंय घेण्याच्या क्षमतेत वृद्धी होते आणि मानसिक स्थिती सृदृढ होते. या तिथीला मालपुआ प्रसाद अर्पित करणे शुभ ठरतं. नैवेद्य लावल्यावर प्रसाद वितरित केल्याने पुण्य फल प्राप्ती होते.
 
केळी
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी अर्थात पंचमीला स्कंदमाता या रूपात देवीची आराधना केली जाते. शारीरिक कष्ट निवारणासाठी देवीला केळीचं नैवेद्य दाखवावं.
 
मध
सहाव्या दिवशी कात्यानी रूपात देवीची पूजा-अर्चना केली जाते. या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी मध आणि विड्याचं नैवेद्य दाखवावं.
 
गूळ
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री रूपात देवीची पूजा केली जाते. नकारात्मक शक्तींपासून बचावासाठी आपण गुळाचं नैवेद्य दाखवू शकता.
 
नारळ
महागौरी देवीची आठव्या रूपात पूजा करतात. ही अन्न-धन देणारी देवी आहे. देवीच्या या रूपाला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो. याने संतान सुख प्राप्ती होते.
 
डाळिंब
नवरात्रीच्या नवव्या दिवशी अर्थात नवमीला सर्व सुख आणि सिद्धी प्रदान करणारी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी या दिवशी देवीच्या नैवेद्यात डाळिंब सामील केलं जातं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रामरक्षेची उत्पत्ती