शाकंभरी देवीला दुर्गादेवीचे सौम्य रुप मानले गेले आहे. देवीचे हे रुप अत्यंत दयाळु, कृपाळु आणि प्रेमळ आहे. शाकंभरी नवरात्र दरम्यान देवीची आराधना करुन व्रत, पूजा-पाठ, प्रार्थना, तीर्थ यात्रा आणि दान करणे शुभ असतं. या दरम्यान पवित्र नद्यांमध्ये स्नान करुन देवीचा आशीर्वाद प्राप्त करावा आणि चांगले कार्य करावे.
देवी शाकंभरी पूजा विधी
भाविकांनी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे किंवा अंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचे पाणी मिसळून स्नान करावे.
भाविकांनी बाणशंकरी प्रतः स्मरण मंत्र जप करावा.
देवी शाकंभरीची मूर्ती किंवा फोटोला हंगामी भाज्या आणि फळांने सजवावे.
शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन करावे.
देवीला नैवेद्य दाखवावा.
कुटुंबासह देवीची पूजा आणि आरती करावी.
सर्व भक्तांना सात्विक आहार प्रसाद म्हणून वितरित करावा.
व्रत करणार्यांनी कथा नक्की करावी.