Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरात्री 2024: नऊ देवी मंत्र

नवरात्री 2024: नऊ देवी मंत्र
, गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024 (07:17 IST)
1. शैलपुत्री
बीज मंत्र- ह्रीं शिवायै नमः ।
शैलपुत्री देवीचे प्रतिपदच्या दिवशी पूजन केले जाते. मूलाधारात ध्यान करुन देवीचे मंत्र जपतात. धन-धान्य-ऐश्वर्य, सौभाग्य-आरोग्य आणि मोक्ष देणारी देवी आहे. 
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं शैलपुत्र्यै नमः ।'
 
2.  ब्रह्मचारिणी
बीज मंत्र- ह्रीं श्री अम्बिकायै नमः ।
स्वाधिष्ठान चक्रात ध्यान करून ब्रह्मचारिणी देवीची साधना केली जाते. संयम, तपश्चर्या, त्याग आणि विजयप्राप्ती दायिका आहे.
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं ब्रह्मचारिण्यै नमः ।'
 
3. चन्द्रघंटा
बीज मंत्र- ऐं श्रीं शक्तयै नमः ।
चन्द्रघंटा देवीचे मणिपुर चक्रात ध्यान केले जाते. कष्टांपासून मुक्ती आणि मोक्ष प्राप्तीसाठी या देवीची पूजा केली जाते.
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं चन्द्रघंटायै नमः ।'
 
4. कूष्मांडा
बीज मंत्र- ऐं ह्री देव्यै नमः ।
कूष्मांडा देवीचे अनाहत चक्रात ध्यान करुन साधना केली जाते. रोग, दोष, शोक निवृत्ति आणि यश, बल व आयु दात्री मानली जाते.
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं कूष्मांडायै नमः ।'
 
5. स्कंदमाता
बीज मंत्र- ह्रीं क्लीं स्वमिन्यै नमः ।
स्कंदमाता देवीची आराधना विशुद्ध चक्रात ध्यान करुन केली जाते. सुख-शांती आणि मोक्ष दायिनी आहे.
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं स्कंदमातायै नमः।'
webdunia
6. कात्यायनी
बीज मंत्र- क्लीं श्री त्रिनेत्रायै नमः ।
कात्यायनी देवीची आज्ञा चक्रात ध्यान करुन आराधना केली जाते। भय, रोग, शोक-संताप मुक्ती आणि मोक्ष दात्री आहे.
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं कात्यायनायै नमः ।'
 
7. कालरात्रि
बीज मंत्र- क्लीं ऐं श्री कालिकायै नमः ।
कालरात्री देवीचे ललाटमध्ये ध्यान केले जाते. शत्रूंचा नाश, कृत्य बाधा दूर करुन साधकाला सुख-शांती प्रदान करुन मोक्ष देते.
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं कालरात्र्यै नमः ।'
 
8. महागौरी
बीज मंत्र- श्री क्लीं ह्रीं वरदायै नमः ।
महागौरी देवीचे मस्तिष्कमध्ये ध्यान केले जाते.त्यांची पूजा केल्याने अलौकिक सिद्धी प्राप्त होते. अगदी अशक्यप्राय कामेही पूर्ण होतात.
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं महागौर्ये नमः ।'
 
 
9. सिद्धिदात्री
बीज मंत्र- ह्रीं क्लीं ऐं सिद्धये नमः ।
कपालच्या मध्यभागी माता सिद्धिदात्रीचे ध्यान केले जाते. देवी सर्व सिद्धी प्रदान करते.
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं सिद्धिदात्र्यै नमः ।'

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shardiya Navratri 2024 शारदीय नवरात्र घटस्थापना मुहूर्त