Navratri special Kuttu Dosa Recipe :नवरात्र म्हणजे दुर्गादेवीचे भक्त पूर्ण 9 दिवस उपवास करतात.बरेच लोक नवरात्रीचे व्रत अतिशय धार्मिक पद्धतीने पाळतात. बरेच लोक नवरात्रीसाठी उपवासाचे खातात शिंगाड्याचा पिठाचा शिरा, साबुदाण्याची खिचडी खातात. या शिवाय आपण कुट्टूचा डोसा बनवू शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य -
गव्हाचे पीठ - 5 चमचे
जिरे - चिमूटभर
हिरवी मिरची - 4
तूप - 2 चमचे
बटाटे - 2 उकडलेले
आले - 1/2 इंच
लाल मिरची पावडर - 1/2 टीस्पून
कोथिंबीर पाने - 2 घड
सेंधव मीठ - चवीनुसार
कृती -
सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून मॅश करा आणि त्यात सेंधव मीठ आणि तिखट घाला. कढईत 1 चमचा तूप टाका. नंतर त्यात जिरे ,चिरलेली हिरवी मिरची आणि आले घालून 1 मिनिट शिजवा. यानंतर त्यात मॅश केलेले बटाटे घाला. ते ढवळून मंद आचेवर 4 मिनिटे शिजवा. आता त्यात हिरवी चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा.सारण तयार करा.
डोसा बनवण्याची पद्धत- कुट्टूच्या पिठात सेंधव मीठ, तिखट, हिरवी मिरची मिक्स करा. आता त्यात 1 कप पाणी घालून बॅटर तयार करा. एक तवा घ्या, त्यावर एका वाटीने बॅटर पसरवून द्या. डोसा भोवती तूप घाला म्हणजे ते व्यवस्थित परतले जाईल. आता डोस्याच्या मधोमध सारण भरा आणि शिजवा.उपवासाचा कुट्टूचा डोसा खाण्यासाठी तयार.