Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अँन्ड्रॉईड फोनमधून व्हायरस कसा हटवायचा?

अँन्ड्रॉईड फोनमधून व्हायरस कसा हटवायचा?
तुमचा अँन्ड्रॉईड स्मार्टफोन नेहमीच इंटरनेटशी कनेक्ट असल्याने त्यात व्हायरस शिरण्याची टांगती तलवार कायम असते. कधीकधी हॅकर्समुळेदेखील तुमच्या स्मार्ट फोनमध्ये व्हायरस शिरण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या मोबाइलला व्हायरस लागला असेल, तर त्याची फॅक्ट्री रिसेट करावी लागेल, असा सल्ला दिला जातो. पण फॅक्ट्री रिसेट करण्यामुळे तुमच्या मोबाइलमधील डेटा, गेम्स, मॅसेज, फोटो सर्वच नष्ट होते.
 
त्यामुळे तुमच्या मोबइलची फॅक्ट्री रिसेट करण्याऐवजी काही वेगळे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. जेणेकरून तुमचा मोबाइल डेटाही सुरक्षित राहील आणि फॅक्ट्री रिसेट करावी लागलीच तर तो शेवटचा पर्याय असेल.
 
पण तत्पूर्वी तुम्ही हे जाणून घ्या.
 
1) सर्वप्रथम तुमच्या मोबाइलवरील एखादे अँप वापरतानाच तुम्हाला व्हायरसचा प्रॉब्लेम येतो का?
 
2) तुम्ही गुगल अँपच्याऐवजी इतर कुठून मोबाइल अँप डाउनलोड केलंय?
 
3) तुम्ही एखादे अँप डाउनलोड केल्यापासूनच हा प्रॉब्लेम येतोय का?
 
जर तुमचं उत्तर होय असेल, तर तुमच्या मोबाइलला नक्की व्हायरस डिटेक्ट झाला आहे.
 
तर मग तुम्ही पहिल्यांदा तुमच्या मोबाइलवर एखादा अँन्टी व्हायरस इन्सटॉल करून, संपूर्ण मोबाइल स्कॅन करून घ्या. तेही होत नसेल तर तुम्ही तुमचा मोबाइल सेङ्ख मोडवर बूट स्कॅन करु शकता. ज्यामुळे तुम्ही व्हायरस लागलेल्या फाईल निवडून डिलीट करु शकता.
 
जेव्हा तुमचा मोबाइल सेफ मोडवर स्कॅन होत असेल, तेव्हा तुमच्या मोबाइलवरील एकेक अँप हळूहळू काम करणे बंद होईल आणि तुमचा डेटा कनेक्शनदेखील बंद होईल. हे सर्व तुमच्या मोबाइलच्या सुरक्षेसाठी होते.
 
जर तुमच्या मोबाइलची ऑपरेटिंग सिस्टिम अँन्ड्रॉईड 4.0 किंवा त्यापेक्षाही जुनी असेल, तर तुम्ही सहज तुमचा मोबाइल सेफ मोडवर बूट करू शकता.
 
अँन्ड्रॉईड 4.0 ऑपरेटिंग सिस्टिम असलेला मोबाइल बूट स्कॅन करताना सर्वप्रथम डिव्हाईस ऑफ करा. नंतर आपल्या डिव्हाईसचे ऑन-ऑफचे बटन थोडावेळ दाबून धरा. जेव्हा तुम्हाला तुमच्या डिव्हाईसवर लोगो दिसेल, त्यावेळी आवाज कमी-जास्त करण्याचे बटण दाबून धरा. जोपर्यंत तुमच्या डिव्हाईसचे बूट पूर्ण होत नाही तोपर्यंत. त्यानंतर तुम्ही सेफ मोडवर असाल.
 
अँन्ड्रॉईड 4.0 पेक्षा जुनी ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या डिव्हाईसचे ऑन-ऑफचे बटन जोपर्यंत एक पॉप अप दिसत नाही तोपर्यंत दाबून धरा. त्यानंतर ओकेवर क्लिक करा म्हणजे तुमचा मोबाइल सेफ होईल. त्यानंतर तुम्हाला नको असलेल्या फाईल तुम्ही डिलीट करू शकता. सगळ्यात चांगलं म्हणजे तुम्ही डाउनलोड केलेले अँप सर्वात पहिल्यांदा डिलीट कराल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खडसेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा : पृथ्वीराज चव्हाण