Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाण्यात ओला झाला असेल मोबाइल तर करा हे उपाय...

पाण्यात ओला झाला असेल मोबाइल तर करा हे उपाय...
पावसाळ्यात ओले होणे स्वाभाविक आहे. मोसमाची मजा घेत सेल्फी काढताना मोबाइलला पाणी लागणे साहजिक आहे, किंवा चुकीने मोबाइल पाण्यात पडल्यावर समस्या उद्भवते. कारण फोनला वाळवल्यानंतरही त्यातील आर्द्रता तशीच राहते आणि आपल्याला आपल्या आवडत्या हेडसेट आणि डेटाचे नुकसान झेलावं लागतं.
 
परंतू आता घाबरण्यासारखं काही नाही, यावर तोडगा आहे. जर आपला मोबाइल पाण्यात भिजला असेल, तर त्याला वाळवण्याचे प्रयत्न करू नका, कारण असे केल्याने बाष्प तयार होईल आणि आर्द्रतेमुळे समस्या वाढेल.
यासाठी सर्वात श्रेष्ठ उपाय आहे. तांदळाचा डबा. ऐकून आश्चर्य वाटत असेल पण आपला पाण्यात भिजलेल्या मोबाइलला नीट पुसून घ्या आणि त्याला तांदळाच्या डब्यात ठेवून द्या. याने त्याची आर्द्रता शोषली जाईल आणि आपला फोन सुरक्षित राहील.
 
याव्यतिरिक्त एक आणखी उपाय आहे, सिलिका जॅलने भरलेला झिपलॉक पॉकेट. तज्ज्ञांप्रमाणे ओला मोबाइलला ड्राय करण्याने निष्क्रिय होऊ शकतो. याऐवजी आइसोप्रापाइल बाथ या अल्ट्रासोनिक क्लीनर वापरणे अधिक फायद्याचे आहे.
 
ह्या दोन पद्धती आपला मोबाइल फोन सुरक्षित करण्यात मदत करू शकतात. आता मोबाइल ओला झाल्यावर माहीत आहे न, काय करायचे आहेत ते?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गंमत नावातली