Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेअरचॅट हे भारताचे पहिले सोशिअल नेटवर्किंग अॅप

शेअरचॅट हे भारताचे पहिले सोशिअल नेटवर्किंग अॅप
, शुक्रवार, 10 जून 2016 (16:54 IST)
वेगवेगळ्या संस्कृती आणि भाषांनी नटलेला आपला भारत देश हा जगातील सर्वात जास्त इंटरनेट युजर्स मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जरी ही संख्या फार कमी असली तरी अश्या परिस्थितीमध्ये एक विशिष्ट वर्ग “डिजीटल इंडिया“ चे स्वप्न पाहत आहे. यामध्ये बरेच अडथळे आहेत, जसे की ज्या देशामध्ये प्रत्येक १०० किलोमीटर नंतर भाषा बदलते, अश्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतामधील लोकांना जोडण्यासाठी फक्त एक भाषा पुरेशी नाही. इंटरनेटच्या या जगामध्ये भाषेचा हा मुद्दा जटीलच नाही तर विचार करण्यासारखा पण आहे.
 
“शेअरचॅट” हे भारताचे पहिले सोशिअल नेटवर्किंग अॅप आहे जे फक्त आणि फक्त भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. सध्या मराठी, हिंदी, मल्याळम आणि तेलुगु भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या शेअरचॅटने १० लाख डाउनलोडचा पल्ला गाठला आहे आणि लवकरच इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा येणार आहे. “आई आई टी" कानपूर च्या विद्यार्थ्यांनी चालू केलेले हे सोशल नेटवर्क दोन प्रकारच्या लोकांना टार्गेट करत आहे. पहिले ते १० करोड लोक जे आत्ताच नव्याने इंटरनेटच्या जगामध्ये आले आहेत आणि आपल्या मोबाईल वरती त्याला समजण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि दुसरे राहिलेले १ अब्ज लोक ज्यांच्या पर्यंत इंटरनेट पोहोचलेले नाही आणि पुढच्या काही काळामध्ये लवकरच पोहोचण्याची शक्यता आहे. याप्रकारच्या दोन्हीही वर्गांसाठी इंटरनेटवरती मायबोली आणि प्रादेशिक भाषांमध्ये मजकूर आणि सामग्री उपलब्ध असणे आवश्यक आहे. आणि हीच जबाबदारी शेअरचॅट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
शेअरचॅटने या समस्येला खूप बारकाव्याने समजण्याचा प्रयत्न केला आहे. टीममधील जास्तीत जास्त लोक हे लहान भागांमधून आलेले असल्यामुळे त्यांना प्रादेशिक भाषांचे महत्त्व माहिती आहे. आणि यामुळेच वाढत्या लोकप्रियतेनुसार लवकरच बंगाली, गुजराती, तमिळ, कन्नड आणि पंजाबी सारख्या भाषा सुद्धा जोडल्या जाणार आहेत.
 
शेअरचॅट मध्ये युजर कोणतीही एक भाषा निवडून आपल्या फोन वरून लॉग इन करू शकतो. आपल्या भाषेमध्ये फोटो, व्हीडियो, GIF किंवा विनोद, शायरी, कविता स्वतःच्या नावाने पोस्ट करू शकतो. आपल्या आवडीचे पोस्ट टाकणाऱ्या युजर्सला फॉलो करू शकतो. याशिवाय संपूर्ण देशामधून येणारे पोस्ट फेसबुक, व्हाट्सअॅप सारख्या इतर अॅप्स वरती शेअर करू शकतो. तसेच लाईक आणि ऑफलाईन वापरासाठी सेव्ह करण्याचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. सर्व पोस्ट फ्रेश आणि व्हायरल(लोकप्रिय) सारख्या वेगवेगळ्या विभागांमध्ये उपलब्ध आहेत.
 
काही दिवसांपूर्वीच गुगल कडून “Google Launchpad Accelerator Program” हा एक मेंटरशिप प्रोग्राम चालवला गेला, ज्यामध्ये संपूर्ण देशामधून फक्त ६ अॅप्सची निवड झाली. आणि त्यामध्ये सुद्धा “शेअरचॅट” ने बाजी मारली आहे. या प्रोग्राम नुसार शेअरचॅट टीमला सहा महिन्यांसाठी गुगलच्या एक्सपर्टस् कडून सल्लेबाजी तसेच आर्थिक मदत सुद्धा मिळणार आहे. याव्यतिरिक्त आमचे सर्वात महत्त्वाचे यश म्हणजे युजर्स चे आम्हाला मिळालेले प्रेम,जे आम्हाला अजून मेहनत करण्यासाठी आणि नवीन गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

#webviral पुतळ्यासोबत अश्लील चाळे