Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Honor 8C भारतात लाँच, 11,999 रुपयांमध्ये मिळेल 4GB Ram

Honor 8C भारतात लाँच, 11,999 रुपयांमध्ये मिळेल 4GB Ram
, गुरूवार, 29 नोव्हेंबर 2018 (17:07 IST)
हुवावेचे सब ब्रांड हॉनरने भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे आणि त्याचा नाव आहे हॉनर 8सी आहे. हे स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट अमेजनवर एक्सक्लूसिव प्रमाणात उपलब्ध राहील. कंपनीने ऑनर 8सीला काही दिवसांअगोदरच चिनी बाजारात सादर केले होते. या   स्मार्टफोनमध्ये नॉच डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर, फेस अनलॉक सारखे फीचर उपलब्ध आहे. किमतीची गोष्ट केली तर 4GB रॅम आणि   32GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे, जेव्हा की स्मार्टफोनच्या 4GB रॅम व 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपए आहे.   
Honor 8C चे स्पेसिफिकेशन 
डुअल सिम फीचर असणारे ऑनर 8सी स्मार्टफोन एंड्रॉयड ओरियो 8.1 वर आधारित ईएणयूआई 8.2 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 6.26 इंचीचा एचडी प्लस टीएफटी आयपीएस एलसीडी पॅनल देण्यात आले आहे. हॉनर 8सी स्मार्टफोनमध्ये यूजर्सला ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर मिळेल, जो एड्रेनो 506 जीपीयू, 4जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज सोबत येईल. स्मार्टफोनच्या स्टोरेजला 256 जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. कॅमरेची गोष्ट केली तर ऑनर 8सीमध्ये कंपनीने 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच कंपनीने फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा f/2.0 अपर्चरचा कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छिंदमला केले पोलिसांनी तडीपार, शिवरायांचा अपमान केला होता