Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोटोरोलाचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच होणार

Motorola's first foldable smartphone will be launched in India
, बुधवार, 25 डिसेंबर 2019 (15:37 IST)
मोटोरोलाचा सर्वात महागडा फोन आणि पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. Motorola Razr (2019) कडून हा फोन लाँच करण्यात्या तयारीत आहे. मोटोरोलाने रेझर 2019 ला भारतात लाँच करणसाठी टीझर लाँच केला आहे. ट्विट करून मोटोरोलाने ही टीझर लाँच केले आहे. मोटोरोलाच्या या फोल्डेबल स्मार्टफोनला गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच करण्यात आले होते. या फोनची विक्री जानेवारी महिन्यापासून सुरू होणार आहे. या फोनची टक्कर सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड  आणि हुवेईच्या मेट एक्ससोबत राहणार आहे.
 
मोटोरोला इंडियाने ट्विटवरवर एक पोस्ट शेअर करून ही घोषणा केली आहे. Motorola Razr (2019) ला लवकरच भारतात लाँच करणत येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. परंतु, कंपनीने लाँच करण्याची  तारीख अद्याप जाहीर केली नाही. कंपनीने नोव्हेंबरमध्ये याच्या लाँचिंगनंतर भारतीय वेबसाइटवर एक रजिस्ट्रेशन पेज तयार केले होते. या ठिकाणी ग्राहकांना अपडेटेड माहिती मिळू शकत आहे. कंपनी लवकरच हा फोन लाँच करणार असली तरी या फोनच्या किमतीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. गेल्या महिन्यात अमेरिकेत करण्यात आलेल्या घोषणेच्या जवळपास या फोनची किंमत असू शकते. अमेरिकेत या फोनची किंमत 1,499 डॉलर म्हणजेच भारतात या फोनची किंमत 1 लाख 6 हजार रुपये असू शकते. तर सॅमसंगच गॅलेक्सी फोल्डची किंमत 1 लाख 64 हजार 999 रुपये इतकी आहे.
 
Motorola Razr (2019) चे खास वैशिष्ट्य म्हणजे यात अनफोल्डेड स्टेट 6.2 इंचाचा फ्लेक्सिबल ओएलईडी एचडी (876x2142 पिक्सल) डिस्प्ले आहे. फोल्डेड स्टेटमध्ये 2.7 इंचाचा (600x800 पिक्सल) क्विक व्ह्यू डिस्प्ले आहे. फोल्डेड स्टेटचा हा क्विक डिस्प्ले सेल्फी कॅप्चर करण्यासाठी़, नोटीफिकेशन पाहाण्यासाठी आणि म्युझिक नियंत्रण करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. ह्या फोनमध्ये 6 जीबी रॅम सह ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोल्डेड असताना सेल्फी काढता येऊ शकणार आहे. तर 5 मेगापिक्सलचा सेकंडरीकॅमेरा डिस्प्ले नॉच देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी क्षमता 2,510 एमएएच दिली आहे. फास्ट चार्जिंग करण्यासाठी 15 W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शोएब अख्तर म्हणतो पाकने विराटकडून शिकावे