Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

6 जून रोजी भारतात लॉन्च होणार Nokia चा हा स्मार्टफोन

6 जून रोजी भारतात लॉन्च होणार Nokia चा हा स्मार्टफोन
, शनिवार, 1 जून 2019 (16:41 IST)
नोकिया लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Nokia Mobile ने ट्विटरवर एक टीझर जारी केलं आहे, ज्यात कंपनीने कॅमेरा हायलाइट करत टॅगलाइन लिहिली आहे, 6 जून 2019 ला नवीन प्रकाशात गोष्टी पहा #GetAhead.याशिवाय, नोकियाच्या इतर एका पोस्टने स्पष्ट केले आहे की नवीन फोन स्लीक डिझाइनसह येईल.
 
सिंगल कॅमेरा असल्यामुळे अंदाज लावला जात आहे की येणारा फोन Nokia 2.2 असू शकतो. याव्यतिरिक्त, हे देखील मानले जात आहे की कंपनी HMD ग्लोबल Nokia 6.2 आणि Nokia 5.2 सारखे मोठे स्मार्टफोन देखील लॉन्च करू शकते. Nokia 2.2 ला भारता व्यतिरिक्त अन्य बाजारात देखील सर्टिफिकेशन मिळालं आहे. HMD Global इटलीमध्ये एक ग्लोबल इव्हेंट आयोजित करणार आहे, ज्यात कंपनी नवीन फोन लॉन्च करेल. ग्लोबल इव्हेंटमध्ये Nokia X71 सादर केल्या जाण्याची शक्यता आहे. हा फोन एप्रिलमध्ये तैवानमध्ये लॉन्च केला गेला होता. 
 
Nokia 2.2 किंवा Nokia Wasp ला यूएस एफसीसी सर्टिफिकेशन साइटवर सूचीबद्ध केलं गेलं होतं. यात 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असेल. फोनचे डायमेन्शन 145.96x70.56 मिलिमीटर असेल. कंपनीने Nokia X71 मध्ये 6.39 इंच FHD+ Pure डिस्प्ले उपलब्ध केलं आहे, ज्याचे अस्पेक्ट रेशियो 19.3:9 आहे. यात पंच-होल डिस्प्ले आहे. हे व्हर्टिकल कॅमेरा सेटअप ग्लास बॅक डिझाइनसह सादर केलं गेलं आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर आणि 6 जीबी रॅम आहे. यासह यात 128 जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे, जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. आता 6 जून रोजी कोणता फोन लॉन्च होणार आहे याबद्दल सध्या तरी कोणालाही अधिक माहिती नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेट्रो आणि बसमध्ये महिला करू शकतील मोफत प्रवास