Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Whatsapp ग्रुपवर करू शकाल प्राइवेट रिप्लाई, लवकरच येईल कमालीचे फीचर

Whatsapp ग्रुपवर करू शकाल प्राइवेट रिप्लाई, लवकरच येईल कमालीचे फीचर
जगातील सर्वात प्रसिद्ध मेसेजिंग एप व्हॉट्सएपवर लवकरच कमालीचे फीचर येणार आहे. कंपनीने एपच्या बीटा वर्जनवर या फीचर्सची टेस्टिंग देखील सुरू केली आहे. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर बीटा वर्जनचा वापर करणारे यूजर्स फीचरचा लाभ घेऊ शकतात. नंतर हे फीचर्स सामान्य यूजर्ससाठी देखील सुरू करण्यात येतील. 
 
माहितीनुसार व्हॉट्सएपचे वर्जन 2.7315 वर लवकरच काही नवीन बदल बघायला मिळणार आहे. यात प्रायवेट रिप्लाय, पिक्चर-इन-पिक्चर मोड, शेक टू रिपोर्ट, टॅप टू अनब्लॉग आणि शॉर्टकट लिंक सारखे काही फीचर्स समोर येऊ शकतात. व्हॉट्सएपचे नवीन फीचर आयओएस आणि एंड्रॉयड दोन्ही प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टमवर प्रसिद्ध करण्यात येतील.  
प्रायवेट रिप्लाय व्हॉट्सएपच्या या खास फीचरच्या माध्यमाने यूजर ग्रुपवरच्या कोणत्याही यूजर किंवा ऍडमिनला प्रायवेट रिप्लाई करू शकतात. या मेसेजला ग्रुपवर फक्त सेंडर आणि प्रायवेट रिसीवरच बघू शकतील.  
 
पिक्चर-इन-पिक्चर
यूट्यूब आणि गूगल मॅपनंतर आता फेसबुकने आपल्या मेसेजिंग एपावर पिक्चर-इन-पिक्चर मोडला टेस्ट करणे सुरू केले आहे. या फीचरच्या माध्यमाने यूजर व्हॉट्सएपसोबत एक वेगळ्या विंडोत यूट्यूब किंवा दुसरा एखादा एप ऍक्सेस करू शकतील.  
टॅप टू अनब्लॉक
त्या शिवाय टॅप टू अनब्लॉक फीचरने बीटा वर्जनमध्ये आपली जागा बनवली आहे. या फीचरच्या माध्यमाने युजर फक्त एक टॅप करून ब्लॉक काँटॅक्टला अनब्लॉक करू शकतात.  
शेक टू रिपोर्ट आणि शॉर्टकट लिंक
व्हॉट्सएपवर लवकरच शेक टू रिपोर्ट फीचर येणार आहे. यामुळे यूजर एपामध्ये येणार्‍या अडचणींना मात्र फोनला शेककरून रिपोर्ट करू शकतील. तसेच, ग्रुप ऍडमिन शॉर्टकट लिंक फीचरच्या माध्यमाने कुठल्याही नवीन यूजरला इन्वाइट करण्यासाठी लिंक पाठवू शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुजरात निवडणूक : सी प्लेनने धरोई डॅम पोहोचले पीएम मोदी