Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च

जगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च
सॅमसंगने बुधवारी सान-फ्रँसिस्को मध्ये जगातील पहिला फोल्डेबल फोन लॉन्च केला. सॅमसंगने त्याला Galaxy Fold हे नाव दिलं आहे. वैशिष्ट्ये जाणून घ्या :-
 
* गॅलेक्सी फोल्डची किंमत 1,980 डॉलर (1.41 लाख रुपये) आहे. हे 26 एप्रिलपासून भारतात उपलब्ध होईल.
* मोबाइल फोनमध्ये दोन डिस्प्ले दिले गेले आहे. जेव्हा हा फोल्डेबल फोन, स्मार्टफोन मोडमध्ये असेल त्याचा स्क्रीन आकार 4.6 इंच असेल. तसेच जेव्हा हा फोन टॅब्लेट मोडमध्ये असेल त्याचा स्क्रीन आकार 7.3 इंच असेल.
* या फोनमध्ये 5G व्हेरियंट देखील राहील, परंतु कदाचित ते भारतात लॉन्च होणार नाही.
* सॅमसंगच्या या फोनमध्ये वापरकर्ते एकाच वेळी तीन अॅप्स वापरू शकतात.
* एका स्क्रीनवरून दुसर्‍या स्क्रीनवर जाण्यासाठी फोनमध्ये App Continuity फीचर आहे.
* या फोल्डेबल फोनमध्ये प्रत्येक स्क्रीन स्वतंत्रपणे काम करेल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युवा सेनेचे प्रताप जम्मू काश्मीर येथील विद्यार्थ्यांना जबर मारहाण