Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सॅमसंग Galaxy S8, Galaxy S8 Plus स्मार्टफोन लाँच

samsung galaxy s8
अॅपल 7ला टक्कर देण्यासाठी सॅमसंगने गॅलक्सी नोट 7 घाईघाईने बाजारात आणला. मात्र, त्याच्या बॅटरीमध्ये तांत्रिक त्रुटी राहिल्या होत्या. त्यामुळे नोट 7चा स्फोट होऊ लागला होता.
 
यामुळे कंपनीला अब्जावधींचं नुकसानही झालं. त्यामुळे बाजारात टिकून राहण्यासाठी सॅमसंगने गॅलक्सी एस-8 आणि एस-8 प्लसचं काल अमेरिकेत लॉन्चिंग केले.
 
हे दोन्ही मॉडेल्स 21 एप्रिलपासून ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, सॅमसंगनं यांच्या किंमतीबाबत अद्याप खुलासा केलेला नाही.
 
सॅमसंग गॅलक्सी S8 आणि S8 प्लसचे खास फीचर्स:
 
सॅमसंग गॅलक्सी S8 मध्ये 5.8 इंच आणि गॅलक्सी S8 प्लसमध्ये 6.2 इंच डिस्प्ले आहे. याचं रेझ्युलेशन 1440×2960 पिक्सल आहे. या स्मार्टफोनचे कर्व्ह्ड एज देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये इनव्हिजिबल होम बटण देण्यात आलं आहे. डिव्हाईसच्या रिअर पॅनलच्या कॅमेऱ्याखाली फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आलं आहे.
गॅलक्सी S8 आणि S8 प्लसच्या प्रोसेसरसाठी कंपनीनं 10nm चिपसेट तयार करण्यात आलं आहे. ज्यामुळे बॅटरी बराच वेळ चालेल. हे दोन्ही डिव्हाईस Snapdragon 835 किंवा सॅमसंगच्या Exynos प्रोसेसरसोबत येईल. 4 जीबी रॅम आणि 64 जीबीचं स्टोरेज देण्यात आलं आहे. एसडी कार्डच्या साह्य्याने याचं मेमरी वाढवता येऊ शकते.
गॅलक्सी S8 मध्ये 3,000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर S8 प्लसमध्ये 3,500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
 
सॅमसंगच्या स्मार्टफोनची खासियत म्हणजे त्याची कॅमेरा क्लॉलिटी. गॅलक्सी S8 आणि S8 प्लसमध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

TVF च्या अरुणाभ कुमार विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा