Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 28 April 2025
webdunia

WhatsApp वर नवीन फीचर, असे वापरा

WhatsApp new feature Swipe to Reply
WhatsApp ने आपल्या अँड्रॉइड बीटा व्हर्जनमध्ये 'Swipe to Reply' फीचर सामील केले आहे. हा फीचर WhatsApp च्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.18.300 यावर उपलब्ध आहे.
 
हे फीचर आयओएस व्हर्जनवर आधीपासून उपलब्ध आहे. नवीन फीचर आल्याने यूजर्स केवळ एका स्वाइपद्वारे लगेच आपल्याला मित्र आणि कुटुंबाच्या सदस्यांना उत्तर देऊ शकतात. 
 
या प्रकारे वापरा फीचर
नवीन 'Swipe to Reply' अॅपद्वारे कोणत्याही मेसेजला उजवीकडे स्वाइप करून आपण सरळ मेसेजचं उत्तर देऊ शकाल. याचा अर्थ आता यूजर्सला चॅट किंवा ग्रुपमध्ये कोणत्याही मेसेजला उत्तर देण्यासाठी रिप्लाय आयकॉन अधिक वेळेपर्यंत दाबून ठेवणे गरजेचं नाही
 
WABetaInfo वेबसाइटवर एक GIF देखील पोस्ट केले गेले आहे. या GIF मध्ये WhatsApp अँड्रॉइड वर 'Swipe to Reply' फीचर कश्या प्रकारे काम करतं दर्शवण्यात आले आहे.
 
WhatsApp द्वारे आयओएस आणि अँड्रॉइड व्हर्जनसाठी Dark Mode वर काम करण्याची बातमी आहे. परंतू हे फीचर सर्व यूजर्ससाठी केव्हापासून उपलब्ध होईल हे निश्चित नाहीये.
 
WABetaInfo रिपोर्टप्रमाणे WhatsApp च्या बीटा व्हर्जन 2.18.282 मध्ये एक आणखी नवीन फीचर सामील करण्यात आले आहे. या फीचरमध्ये group info टॅबमध्ये आता 'more' नावाचं एक बटण दिसेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ना समुद्राला, ना इतर नद्यांना मिळते ही 'लुनी नदी'