अपरिचित वा परिचित व्यक्तीला कॉल करण्याचा प्रॅन्क तुम्ही कधीतरी केला असेलच.. मात्र ट्रूकॉलरमुळे तुम्ही पकडले गेले असाल, पण तुम्हाला माहितेय का, की असेदेखील एक अँप आहे ज्याने तुम्ही तुमच्याच सिमवरून कॉल कराल पण समोरच्याला मात्र वेगळाच नंबर दिसेल.
गुगल प्ले स्टोर आणि अँपल स्टोरवर ‘टेक्स्ट मी’ नावाचे हे अँप आहे. या अँपने तुम्ही कोणाही व्यक्तीला कॉल किंवा मेसेज करू शकता आणि समोरच्याला त्याचा थांगपत्ताही लागणार नाही. या अँपच्या मदतीने यूजर अनेक नंबर सेट करू शकतो. तुम्ही कोणताही नंबर सेट करू शकता.
जेव्हा तुम्ही कॉल कराल तेव्हा तुमचा नंबर न दिसता तुम्ही सेट केलेला नंबर समोरच्या व्यक्तीला दिसेल. एकच नंबर जर सेट केला तर हे अँप ङ्ख्री आहे. मात्र एकहून अनेक नंबर वापरायचे असल्यास महिन्याला 60 रूपये भरावे लागतील.