Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कदाचित या सवयींमुळे ‍हाती नाही लागत यश

कदाचित या सवयींमुळे ‍हाती नाही लागत यश
आपण खूप काम करताय पण इच्छित परिणाम मिळत नाहीये. खूप मेहनत करूनही हात रिकामेच. विचार करा की या 10 सवयींमुळे तर आपण मागे नाही:
झोपेपूर्वी काम: कामासाठी झोपेची बळी देत असाल तर इथे चुकताय, दिवसभर काम केल्यानंतर थकवा येणं साहजिक आहे अशात कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
 
इंटरनेटची सवय: कामाच्या मध्ये अचानक काही लक्षात आलं की लागले सर्च करायला. आधी एक साईट मग दुसरी आणि असं करता करता कधी दहावी साईट होऊन जाते कळतंच नाही. अर्थातच इंटरनेट व्यसन आहे.
 

ब्रेकफास्ट न करणे: ब्रेकफास्ट टाळून आपल्याला वाटतं की वेळ वाचवला पण याने एनर्जी कमी होते. सकाळी योग्य आहार घेतला नाही तर दिवसभर आपण हवं तितकं आउटपुट देऊ पाण्यात अक्षम राहता. नंतर भरपूर लंचही याची पूर्ती करू शकतं नाही.
webdunia
आवश्यक काम टाळणे: अरे यार! हे करायचे तर होते पण.... चल संध्याकाळी नक्की करेन किंवा उद्या तर कन्फर्म... बस याच गोष्टी आपल्याला घेऊन बुडतात.

वारंवार ईमेल चेक करणे: प्रत्येक पाच मिनिटात हे बघायचे की ईमेल तर नाही आला. मुख्य म्हणजे स्मार्टफोनवर. आपल्याला विश्वास होणार नाही पण अशामुळे आपण दिवसभरात किमान अर्धा तास तरी वाया घालवतो.
webdunia
मीटिंग घेणे: अनावश्यक मीटिंग याहून अधिक वेळ वाया घालवण्यासारखी कोणती गोष्टच नाही. मीटिंगऐवजी केवळ ईमेल पाठवून काम होत असेल तर याहून चांगला पर्याय काय असू शकतो.

मल्टिटास्किंग: हे पण करून घेईन, तेही बघून घेईन. रिसर्चप्रमाणे सर्व काम करण्याची क्षमता केवळ 2 टक्के लोकांमध्ये असते. एका वेळेस एकच काम करा आणि असं करा की सर्व बघत राहतील.
 
प्राधान्य ठरविण्याच्या निर्णय घेण्यात अपात्रता: जर आपल्या हे माहीत नसेल की कोणतं काम आधी करायचे आहे, तर आपण वेळ वाया घालवत आहात. जर आपण प्राधान्य ठरविण्यात गोंधळून जात असाल तर आपण वेळ आणि एनर्जी दोन्ही वाया घालवता आहात.
webdunia
प्लानिंग च प्लानिंग: प्लानिंग करणे चांगली आणि आवश्यक गोष्ट आहे. पण सर्वस्व प्लानिंगवर निर्भर असेल तर आपण पुष्कळदा संधी गमवाल. कित्येकदा वेळ बघून काम करावी लागतात ती पण प्लानिंगशिवाय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दारू पिऊन लगेच झोपल्याचे दुष्परिणाम