Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काही चांगल्या सवयी ज्या मुलांसाठी उपयोगी असतात

काही चांगल्या सवयी ज्या मुलांसाठी उपयोगी असतात
, मंगळवार, 2 मार्च 2021 (08:15 IST)
असं  म्हणतात की मुलं मोठ्यांचे बघून अनुसरणं करतात. त्यांच्या सवयी, बोलणे पद्धती विचार करणे  इत्यादी. मुलांसाठी त्यांचे पालक त्यांचा आदर्श असतात. अडचणी आल्यावर पालकच मुलांना शिकवतात आणि मदत करतात. जसं जसं मुलं मोठे होतात ते पालकांचे अनुकरण करतात. मुलांच्या चांगल्या घडण मध्ये पालकांची महत्त्वाची भूमिका असते. मुलांना चांगल्या गोष्टी शिकवणे आणि त्यांची सवय लावणे देखील महत्त्वाचे आहे. काही चांगल्या सवयी ज्या मुलांमध्ये असाव्यात जाणून घेऊ या. 
 
1 चांगलं खाणं- मुलांना सगळं खाण्याची सवय लावावी.  मुलं चॉकलेट, मिठाई,जंक फूड मागतात त्यांना हे समजवावे की घरातील बनलेले अन्न चांगले आणि आरोग्यवर्धक आहे. त्यांच्या मध्ये सर्व खाण्याची सवय लावा. जेणे करून त्याचे आरोग्य सुधारेल. 
 
2 शारीरिक काम करू द्या- 
मुलांना बसण्याची सवय लागू देऊ नका, त्यांना कामाची सवय लावा त्यांना घरातून बाहेर खेळायला जाऊ द्या मैदानी खेळ खेळू द्या या मुळे त्यांचा व्यायाम होईल. आणि आरोग्य सुधारेल शिवाय त्यांना त्यांचे काम करू द्या. आत्मनिर्भर बनू द्या. अन्यथा ते आळशी बनतील. 
 
3 सह कुटुंब जेवण करण्याची सवय लावा- 
आजच्या धावपळीच्या काळात कुटुंबाच्या सदस्यांना एकत्र वेळ घालविण्याचा वेळच मिळत नाही त्या मुळे मुलांसह एकत्र बसून जेवण करण्याची संधी मिळतच नसेल तरी रात्रीचे जेवण कुटुंबासह घ्या.जेणे करून मुलांना देखील तशीच सवय लागेल. 
 
4 पाणी प्या सोडा नाही -
मोठ्यांचे अनुसरून मुलं देखील शीतपेय कोल्ड्रिंक्स पिऊ लागतात आणि त्यांना त्याची सवय लागते. त्यांना समजवा की हे आरोग्यास चांगले नाही नारळ पाणी किंवा फळांचा रस किंवा ज्यूस द्या. आणि भरपूर पाणी प्या हे आरोग्यास चांगले असते आणि शरीर हायड्रेट राहत.
 
5 आपली वस्तू नीट ठेवणे- 
वाढत्या वयाच्या मुलांना स्वतःची  खोली नीट ठेव्याला शिकवा. स्वच्छता कशी ठेवायची हे लहानपणा पासूनच शिकवावे. जेणे करून त्यांना सवय लागल्यावर ते स्वतः स्वच्छता ठेवतील.वस्तुंना जागच्या जागी ठेवण्याची सवय लावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतात हे पदार्थ