Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतात हे पदार्थ

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतात हे पदार्थ
, मंगळवार, 2 मार्च 2021 (08:00 IST)
कोलेस्ट्रॉल एक प्रकारचा फॅटी पदार्थ आहे, जे लिव्हरद्वारे  तयार होतो, हे प्रथिनेसह लिपोप्रोटीनचे निर्माण करते.जे फॅट ला रक्तात मिसळू देत नाही.शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात- एचडीएल(हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन,चांगले कोलेस्ट्रॉल) आणि एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन बॅड कोलेस्ट्रॉल)चांगले कोलेस्ट्रॉल हे खूप हलके असतात आणि रक्त वाहिन्यांमधील साठलेली चरबी काढून टाकतो.खराब म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल एलडीएल अधिक चिकट आणि जाड आहे .जास्त असल्यावर रक्तवाहिन्या आणि धमनीच्या भिंतीवर जमा होते. ज्यामुळे रक्ताचा प्रवाह प्रतिबंधित होतो. हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा या सारख्या समस्या उद्भवू शकतात. काही गोष्टींना  समाविष्ट करून वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवू शकतो.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 सुके मेवे -
बदाम,अक्रोड आणि पिस्ता ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्त्वे आढळणारे फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यात मदत करते.
त्यातील फायबर बऱ्याच काळ पोट भरलेलं ठेवते.पाण्यात भिजत ठेवून बदाम आणि अक्रोड मधील चरबी कमी होते.व्हिटॅमिन ई चे प्रमाण वाढते. 
 
2 लसूण -
लसणामध्ये बरेच एन्जाईम्स आढळतात, जे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते. लसणाचे नियमित सेवन केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करतात. हे उच्च रक्तदाब नियंत्रित करतात. 
 
3 ओट्स -
या मध्ये बीटा ग्लुकॉन नावाचे घट्ट चिकट तत्त्व आतड्याची स्वच्छता करून बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करतो. तीन महिने पर्यंत नियमित पणे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण कमी करू शकतो.
 
4 सोयाबीन आणि डाळी -
सोयाबीन , कडधान्ये आणि अंकुरलेले धान्य लिव्हरची रक्तातील एलडीएल कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यात मदत करतात. हे चांगल्या कोलेस्ट्रॉल ला वाढविण्यात मदत करते. 
 
5 लिंबू-
लिंबासह सर्व आंबट फळांमध्ये विरघळणारे  फायबर आढळतात जे बॅड कोलेस्ट्रॉलला रक्तात जाण्यापासून रोखतात. या मधील व्हिटॅमिन सी  रक्तवाहिन्यांची स्वच्छता करून बॅड कोलेस्ट्रॉल पचन तंत्राच्या द्वारे शरीरातून बाहेर निघून जातात. आंबट फळांमध्ये असे एन्जाईम्स आढळतात जे मेटॅबॉलिझम प्रक्रिया वाढवून कोलेस्ट्रॉल कमी करतात. 
 
6 ऑलिव्ह ऑइल-
या मध्ये असलेले मोनो अनसॅच्युरेटेड फॅट कोलेस्ट्रॉलची पातळी स्थिर ठेवण्यात सहाय्यक होते. हे ऑर्टरीच्या भिंती बळकट करते. या मुळे हृदय रोग होण्याची शक्यता कमी होते. हे उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात मदत करते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केमोथेरॅपी काय आहे, त्याचे दुष्प्रभाव आणि उपचारां बद्दल जाणून घ्या