प्रत्येक परीक्षेच्या पूर्वी त्यासाठी केलेली योजना आणि रणनीती महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळा आपण मेहनतीने अभ्यास करतो पण अभ्यास योग्य दिशेला केला जात नसेल तर परिणाम चांगला येत नाही.
बोर्डाच्या परीक्षे साठी काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण चांगले परिणाम मिळवू शकता. जाणून घेऊ या काय आहे त्या टिप्स
1 कठीण प्रश्न विचारा-
आपण पूर्ण अभ्यासक्रम वाचले आहे. जे अवघड प्रश्न आहेत त्यांना लिहून ठेवा आणि शिक्षकांना विचारा. आणि असा विचार करा की मला हे करणे जमेल असं केल्यानं आत्मविश्वास वाढेल.
2 गणित /भोतिकशास्त्रात फार्म्युले महत्त्वाचे आहे-
भोतिकशास्त्रात आणि गणिताच्या तयारीसाठी फार्म्युले लक्षात ठेवा आणि गणित सोडवताना देखील फार्म्युले लिहिण्याची सवय लावा, असं केल्याने चांगले मार्क्स मिळतील.
3 डायग्राम बनवायला विसरू नका-
गणिताच्या ज्यामिती आणि विज्ञान विषयात चित्रांचे फार महत्त्व आहे.परीक्षेचा अभ्यास करताना या चित्रांचा देखील अभ्यास करा तसेच त्यांच्या लेंबलिंग चा सराव देखील करा.
4 प्रश्न लिहिण्याची पद्धत बदला-
दररोज प्रश्नांना लिहून सराव करा.जेणे करून आपण स्वतःला मुख्यपरीक्षेसाठी तयार करू शकाल. सुरेख हस्ताक्षरासह हायलाइट बॉक्स बनवा.
5 टॉपिक्स लक्षात ठेवून आपल्या भाषेत लिहा-
विज्ञान असो, कॉमर्स असो किंवा आर्ट विषय असो कोणत्याही विषयाचे टॉपिक वाचताना त्याचे ठळक मुद्दे काढा आणि त्यांना वाचा.उत्तर आपल्या भाषेत लिहिण्याच्या प्रयत्न करा.असं केल्यानं भाषेच्या ज्ञानात वाढ होईल.
6 सॅम्पल पेपर्स सोडवा-
मागील वर्षाचे सॅम्पल पेपर अशा प्रकारे सोडवा जसे की आपण मुख्य परीक्षा देत आहात.असं केल्याने आपल्याला काय कमतरता आहे ते कळेल आणि चांगली तयारी करण्यासाठी अधिक चांगला वेळ मिळेल
7 फार्म्युल्यांसाठी चार्ट बनवा-
गणित,भौतिकी आणि रसायनशास्त्राच्या इक्वेशनसाठी चार्ट बनवून त्या जागी लावा जिथे आपण जास्त वेळ अभ्यासासाठी बसता.दररोज डोळ्यासमोर असल्याने ते मेंदूत राहील.
8 ब्लु प्रिंटच्या साहाय्याने तयारी करा-
पुस्तकात युनिटच्या इंडेक्स जवळ ब्लूप्रिंट ने परीक्षेची तयारी करा, पेपर ब्लूप्रिंट आधारित असू शकतो.
9 चर्चा करा-
आजचे विध्यार्थी कोणत्याही डाउट्स वर चर्चा करीत नाही. ज्या प्रश्नामध्ये अडथळा आहेआपल्या शिक्षकांशी किंवा मित्रांशी चर्चा करा.
10 उदाहरण देखील सोडवा-
इतिहास,सोशल सायन्स,बायो,कॉमर्स सारखे विषय लक्षात ठेवण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी उदाहरणांची मदत घ्या. समजून वाचा असं केल्याने कोणता ही धडा बऱ्याच काळापर्यंत लक्षात राहील.