Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

विध्यार्थी मित्रानो एम.पी.एस.सी. परीक्षा वेळापत्रक झाले जाहीर, सविस्तर वृत्त

MPSC Exam schedule has been announced
, शनिवार, 23 नोव्हेंबर 2019 (10:59 IST)
लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 
या वेळापत्रकानुसार राज्य सेवा परीक्षा 2020 साठीची मुख्य परीक्षा शनिवारपासून तीन दिवस आणि सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा ही शनिवारी घेण्यात येणार असून उर्वरित सर्व पूर्व तसेच मुख्य परीक्षा रविवारी घेण्याचे नियोजित आहे.
 
राज्य सेवा परीक्षा 2020 साठीची जाहिरात डिसेंबर 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा 5 एप्रिल 2020 रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार, 8 ऑगस्ट ते सोमवार 10 ऑगस्ट, 2020 अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेसाठी जानेवारी 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा 1 मार्च रोजी तर मुख्य परीक्षा दि. 14 जून 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
 
सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा जानेवारी 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा 15 मार्च, 2020 रोजी तर मुख्य परीक्षा 12 जुलै 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
 
महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेसाठी फेब्रुवारी 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा 3 मे 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक 1- 6 सप्टेंबर 2020 रोजी, पेपर क्र. 2 (पोलीस उपनिरीक्षक) 13 सप्टेंबर 2020, पेपर क्रमांक 2 (राज्य कर निरीक्षक)- 27 सप्टेंबर 2020, पेपर क्र. 2 ( सहायक कक्ष अधिकारी)- 4 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
 
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा मार्च 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून पूर्व परीक्षा 10 मे रोजी तर मुख्य परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी मार्च 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 17 मे 2020 मध्ये घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दिनांक‍ 18 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
 
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा एप्रिल 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा 7 जून 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेअंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक 1- दि. 29 नोव्हेंबर 2020 रोजी, संयुक्त पेपर क्रमांक 2 (लिपिक-टंकलेखक)-  6 डिसेंबर 2020, संयुक्त पेपर क्रमांक 2 (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क)- 13 डिसेंबर 2020 रोजी तर संयुक्त पेपर क्रमांक 2 (कर सहायक)- 20 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
 
महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा मे 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा 5 जुलै रोजी तर मुख्य परीक्षा 1 नोव्हेंबर, 2020 रोजी घेण्याचे नियोजित आहे. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा सप्टेंबर, 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून परीक्षा शनिवार 28 नोव्हेंबर, 2020 रोजी घेण्याचे नियोजित आहे. परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑफिसमध्ये आता बिनधास्त डुलकी काढण्याचा रस्ता मोकळा?