राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाने (बसप) घेतला आहे,
पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी लखनौत सांगितले, की आमचा पक्ष राष्ट्रपती निवडणुकीबाबत निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. आमच्या पक्षाच्या चळवळीत आदिवासी समाजाला विशेष स्थान आहे. पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत असा निर्णय आम्ही घेत आहोत.
मायावती यांनी सांगितले, की आदिवासी समाजातील सक्षम व मेहनती महिला देशाच्या राष्ट्रपतिपदी असाव्यात म्हणून बसपने मुर्मू यांना पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, त्या कोणत्याही दबावाशिवाय काम करू शकतील का, हे आगामी काळच सांगेल. कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या सरकारने आदिवासींच्या हितासाठी योग्य निर्णय घेतला, तर बसपला मोठे मोल चुकवावे लागले तरी आम्ही दबाव, भीती न बाळगता विनासंकोच पाठिंबा देतो.