थोडा काळ जातच नाही तर कोरोनाचा विसर पडल्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरू असताना आता पुण्यात H3N2 या विषाणूमुळे बाधा झालेले 22 रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते मार्च या दरम्यान या सर्वांना बाधा झाली आहे. सर्वाधिक रुग्ण 19 ते 60 या वयोगटातले आहेत. तर देशभरात 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत एनआयव्हीने तसा अहवाल दिला आहे. या अहवालावरुन पुण्यात या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याची लक्षण ही सर्वसामान्य फ्लू सारखीच दिसून येत आहेत. देशभरात H3N2ची साथ पसरली आहे. पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या 109 संशयित रूग्णांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. H3N2 संदर्भात आता खासगी रूग्णालयांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.