Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

3 वर्षीय चिमुकलीची श्रीगोेंद्यातून सुटका; अपहरणकर्त्या आरोपीला अटक

arrest
, मंगळवार, 31 मे 2022 (16:03 IST)
भिक मागण्यासाठी आणि लग्नात हुंडा मिळविण्याच्या उद्देशाने तीन वर्षांच्या मुलीचे कोरेगाव पार्क परिसरातून अपहरण करण्यात आले होते. या चिमुकलीला श्रीगोंदा येथे घेऊन जाणार्‍या अपहरणकर्त्या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकून त्या मुलीची सुखरूप सुटका केली आहे. उषा नामदेव चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. उषा ही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तब्बल पाच दिवस 250 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि हातातील पिशवीच्या नावावरून पोलिसांनी थेट महिलेचे घर गाठले.

याबाबत पोलिसांनी सांगितले, एक 23 वर्षाची महिला फुगे विकत असते. ती 23 मे ला दुपारी दीड वाजता ढोले पाटील रोडवरील एका रिक्षात झोपली होती. त्यावेळी तिच्या 3 वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले होते.

तिने दोन दिवस तिचा शोध घेतल्यानंतर मुलगी मिळून येत नाही, हे लक्षात आल्यानंतर 25 मे ला कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे गतीमान करत परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात सहायक निरीक्षक प्रेरणा कुलकर्णी यांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी महिला अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. तब्बल पाच दिवसांनी श्रीगोंदा येथून उषा चव्हाण हिला पकडण्यात यश आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

....जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त !